Take a fresh look at your lifestyle.

देशाची भावी पिढी घडविण्यात “अंगणवाडी” संस्थेचे मोलाचं योगदान

0

देशाची भावी पिढी घडविण्यात अंगणवाडी ही संस्था मोलाचं योगदान देते आहे. बालकांच्या आरोग्य व शिक्षणासाठी केलेली ही गुंतवणूक आहे. बालकांचा शारीरिक आणि मानसिक विकासाचा पाया मजबूत करण्याचं काम अंगणवाड्या करीत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनाअंतर्गत बालकांना पुरक पोषण आहार, लसीकरण, मातांना आहार व आरोग्य मार्गदर्शन, संदर्भ आरोग्य सेवा, पूर्व शालेय शिक्षण उपक्रम, आरोग्य तपासणी या सेवा अंगणवाडीच्या माध्यमातून पुरविण्यात येतात. योजनेअंतर्गत पूर्व शालेय शिक्षण उपक्रम 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रामार्फत प्रकल्प पद्धतीनुसार शिक्षण देण्यात येते. अंगणवाडी करीता सर्व जागा उपलब्ध असलेल्या अंगणवाड्यांना पक्क्या इमारती उपलब्ध करुन देण्यात सर्वच जिल्हा परिषदेस यश आले आहे. यामुळे पुणे जिल्हा महाराष्ट्रात सर्वात जास्त स्वतंत्र पक्क्या अंगणवाडी इमारती असलेला जिल्हा ठरला आहे. माहे ऑगस्ट 2020 मध्ये कुपोषण मुक्ती अभियांनांतर्गत 142 अतितीव्र कुपोषित व 1 हजार 12 मध्ये कुपोषित असे एकुण 1 हजार 154 बालकांना जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, दानशूर व्यक्ती, जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांना दत्तक देवून बालकांना 50 दिवसाकरीता अमायलेजयुक्त आहार, गुळ शेंगदाणा लाडु, खजुर लाडु व फळे इत्यादी देण्यात आले आहे. त्याचा परिणाम म्हणून 61 सॅम बालकांमध्ये सुधारणा झाली व 445 मॅम अशा एकूण 506 बालकांमध्ये सुधारणा झाली आहे. मुलांना आणि मातांना त्यांच्या गावात किंवा वार्डात सर्व पायाभूत आवश्यक सेवा एकत्रितपणे पुरविण्यात येत आहेत. शहरी झोपडपट्ट्यामधून आणि ग्रामीण तसेच आदिवासी विभागात प्रभावी अंमलबजावणी होत असल्यामुळे ‘सक्षम महिला, सदृढ बालक आणि सुपोषित महाराष्ट्र’ हे ध्येय पूर्ण होण्यास मदत होत आहे.

शब्दांकन- जिल्हा माहिती कार्यालय पुणे