स्पर्धा परीक्षा, सरळसेवा अभ्यास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाच्या 25 विभागात 15 हजार 511 पदांची होणार भरती
राज्य सरकारच्या २५ विभागांतील १५ हजार ५११ रिक्त पदांची भरती एप्रिल अखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सामान्य प्रशासन विभागाकडून ७ हजार ४६० रिक्त पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सादर करण्यात आले आहे. तसेच उर्वरित ८ हजार ६१ पदांचे मागणीपत्र काही दिवसांत आयोगाला सादर केले जाणार आहे. त्यानुसार गट अ, ब आणि क प्रवर्गातील रिक्तपदे भरली जाणार आहेत. राज्य सरकारच्या महत्त्वाच्या एकूण ३४ विभागांमध्ये तब्बल अडीच लाखांपर्यंत पदे रिक्त आहेत. काही पदांची भरती ‘एमपीएससी’च्या माध्यमातून तर काही पदे थेट खासगी संस्थांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने यापूर्वीच पाच संस्थांची निवड केली आहे. वित्त विभागाने विविध विभागांमधील महत्त्वाची पदे भरायला मान्यता दिल्याने रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती विस्कटली आणि महसूल मोठ्या प्रमाणावर कमी झाला. त्यामुळे सर्व रिक्त पदांची भरती होऊ शकली नाही. तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात जवळपास ७० हजार पदांची मेगाभरती होईल, अशी घोषणा झाली. परंतु पुढे काहीच
कार्यवाही झाली नाही. महाविकास आघाडी सरकारनेही
सुरवातीला घोषणा केली, परंतु कोरोनाच्या संकटामुळे
अजूनपर्यंत तेवढ्या पदांची भरती झालेली नाही. आता
टप्प्याटप्प्याने पदभरती केली जात आहे.
नववर्षातील मेगाभरतीचे नियोजन
राज्य शासनाच्या २५ विभागातील १५ हजार ५११ रिक्त पदांची होणार भरती सरळसेवा व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरली जातील रिक्त पदे सामान्य प्रशासन विभागाकडून ‘एमपीएससी’कडे सात हजार ४६० पदांचे मागणीपत्र गट अ, ब आणि क प्रवर्गातील पदांची होणार भरती; तीन महिन्यात पदभरती होईल पूर्ण राज्य सरकारच्या घोषणेनुसार अजून ८ हजार ६१ पदांचे जाणार आयोगाला मागणीपत्र.