सामाजिक न्याय विभागाची रमाई आवास योजना…
● अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी (२६९ चौ. फूट घरकुल)
● योजनचे निकष
• महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान १५ वर्षाचे असावे.
• बेघर किंवा पक्के घर नसावे.
• लाभार्थी सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण – २०११(SECC 2011) प्राधान्य क्रम यादीच्या (GPL) बाहेरील असावा.
● लाभ
• ग्रामीण भागात – रु. १.३२ लाख
• डोंगराळ / नक्षलवादी भागात – रु. १.४२ लाख
• शहरी भागात – रु.२.५० लाख

● अर्ज कुठे करावा
• स्थानिक स्वराज्य संस्था