केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ अवश्य घ्या…
● ग्रामीण / शहरी भागाच्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या १८ ते ५९ वयोगटातील कर्ता स्त्री/पुरूष मरण पावल्यास कुटुंबियांना एकरकमी रु. २०,०००/- दिले जाते
● आवश्यक कागदपत्रे
• विहीत नमुन्यातील अर्ज.
• या योजनेचा लाभ मृत्यू पावलेल्या स्त्री / पुरुषाच्या विधुरास/ विधवेस, अज्ञान मुलांना, अविवाहित मुलींना, अवलंबून असलेल्या आई- वडिलांना
• तलाठी यांचेकडील जबाब, पंचनामा, अहवाल
• मृत्यु दाखला, जन्म मृत्यु नोंद वहीमधील मृत्यूची नोंद असलेल्या पानाची छायांकीत प्रत, वयाचा पुरावा
• रहिवाशी दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, अर्जदाराचे फोटो, बँक पासबुक झेरॉक्स इत्यादी.

● अर्ज कुठे करावा
तहसील कार्यालय, सेतु केंद्र
aaplesarkar.mahaonline.gov.in