‘या’ विद्यार्थ्यांना बारावी पास नंतर मिळणार ४३ हजारांचा भत्ता…
१२वी नंतर वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यासाठी शासनाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत व्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ४३ हजार रुपयांचा भत्ता दिला जातो. शासनाच्या या योजनेचा जिल्ह्यातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या युवकांनी लाभ घेणे गरजेचे आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
धनगर समाजातील व्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना सुरू केली आहे.
बारावीनंतर उच्च शिक्षणावेळी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या मुलांना या योजनेचा लाभ घेता येतो.
४३ हजारांचा भत्ता :- भोजन भत्ता २५ हजार, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत भोजन भत्ता म्हणून शासनाच्या वतीने २५ हजार रुपये मिळतात. १२ हजार शहरी भागात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांना या योजनेंतर्गत निवास भत्ता म्हणून १२ हजार रुपये दिले जातात.
कोणाला मिळणार लाभ :- १२वीनंतर उच्च शिक्षण घेताना वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना उपयुक्त आहे.
या योजनेंतर्गत निर्वाह भत्ता म्हणून विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये दिले जातात, असे एकूण ४३ हजार मिळतात.
योजनेसाठी लागणारे कागदपत्रे :- विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र. वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणारा दाखला, बँक खाते, उच्च शिक्षणातील आवश्यक कागदपत्रे लागतात.
अर्ज करण्याची पद्धत :- या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज मुलांना करता येतो. हे अर्ज सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे प्राप्त होतात. निकषात बसणाऱ्या मुलांना या शासकीय योजनेचा लाभ दिला जातो.