Take a fresh look at your lifestyle.

घरातल्या कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास ‘या’ योजनेद्वारे मिळणार आर्थिक सहाय्य….

0

जर कुटुंबातील कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला आणि ते कुटुंब निराधार झाले तर अशा नागरिकांसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना राबवली आहे. या योजनेद्वारे कुटुंबांना सरकारकडून निधी दिला जातो. मात्र ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 15,000 किंवा त्यापेक्षा कमी असेल अशा कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळतो.

या योजनेचा फायदा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयात अर्ज करावा लागतो. तसेच अर्जासोबत कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, कुटुंबप्रमुखाचा जन्म-मृत्यू नोंदणीचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, ओळखपत्र, वारसा प्रमाणपत्र, कुटुंब दारिद्रय़रेषेखालील असल्यास त्याचा दाखला यासह आदी कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.

त्यानंतर जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयातून या कागदपत्रांची छाननी झाल्यावर संबंधित कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेत पात्र ठरलेल्या कुटुंबाला 20 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केंद्र सरकारकडून दिले जाते.