Take a fresh look at your lifestyle.

तलाठ्यांची अंतिम यादी ‘या’ तारखेपर्यंत होणार जाहीर…

0

तलाठीपदाच्या परीक्षेसाठी नमुना उत्तरपत्रिका जारी करण्यात आली असून, येत्या रविवारपर्यंत त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर, पुढील आठवड्याभरात हरकतींचे संकलन करून, ३१ ऑक्टोबरपर्यंत उत्तरपत्रिका पुन्हा अंतिम करण्यात येऊन, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना त्याआधारे आपले गुण कळू शकणार आहेत.

मात्र, अंतिम गुणवत्ता यादी १५ डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात येईल, अशी माहिती तलाठी परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी दिली. २६ जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात ४ हजार ४६६ तलाठीपदांसाठी तब्बल ८ लाख ५६ हजार जण परीक्षेला बसले होते. ही परीक्षा ५७ टप्प्यात घेण्यात आली. त्यानंतर प्रत्येक टप्प्यात घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेची नमुना उत्तरपत्रिका जारी करण्यात आली आहे.