Take a fresh look at your lifestyle.

दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मिळणार ‘या’ योजनेचा लाभ….

0

पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपयांची सरकारी मदत कायम ठेवतानाच आता दुसरे अपत्य मुलगी असेल तर महिलांना अधिकचे सहा हजार रुपये राज्य सरकार देईल. पंतप्रधान मातृवंदना योजना-२ लागू करण्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य विभागाने सोमवारी केली. आता हे पाच हजार रुपये दोन टप्प्यातच दिले जातील.

– ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रति वर्ष आठ लाख रुपयेपेक्षा कमी आहे तसेच किमान १८ वर्षे व कमाल ५५ वर्षे वय असलेल्या महिलांसाठी योजना असेल.

– दुसरे अपत्य जुळे झाले आणि त्यात दोन्ही मुली असतील किंवा एक मुलगी एक मुलगा झाला तरी एकाच मुलीसाठी लाभ दिला जाईल.

योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक बाबी

लाभार्थी व पतीचे आधार कार्ड.

लाभार्थीचे आधार संलग्न बँक खाते.

गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत 150 दिवसांच्या आत नोंद.

शासकीय संस्थेत गरोदर कालावधीत तपासणी.

बाळाचा जन्मनोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण प्रमाणपत्र.

लाभार्थीने अटींची पूर्तता केल्यानंतर 30 दिवसांच्या आत लाभाची रक्कम अदा करण्यात येते.

जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासकीय संस्थेमध्ये तसेच शासनमान्य रुग्णालयात बाळंतपण झाल्यास या योजनेचे मिळणारे आर्थिक साहाय्य देखील मिळते.