Take a fresh look at your lifestyle.

शासकिय अधिकारी व कर्मचारी यांच्या वैद्यकिय तपासणी सुविधा बाह्य संस्थेमार्फत उपलब्ध करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत शासन निर्णय जारी

0

ग्रामीण रुग्णालय, ५० व १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालये व विभागाच्या अधिपत्याखालील इतर आरोग्य संस्थांमध्ये शासन निर्णय दि.२२.०४.२०२२ प्रमाणे वैद्यकिय चाचण्या उपलब्ध करावयाच्या आहेत.

क्र.०२ अन्वये एचएलएल या बाह्यसंस्थेस राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये लॅबोरेटरी सेवा उपलब्ध करण्यास प्रशासकिय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे एचएलएल संस्थेमधील होत

असलेल्या वैद्यकिय चाचण्या वगळून वैद्यकिय धोरणानुसार अंतर्भूत असलेल्या उर्वरित वैद्यकिय चाचण्या ज्या आरोग्य संस्थामध्ये उपलब्ध नाहीत, त्या चाचण्यां विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थामध्ये उपलब्ध करण्याकरीता प्रत्येक चाचणीनिहाय होणाऱ्या अंदाजित रकमेस खालील विवरणपत्राप्रमाणे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

सर्व कार्यरत राज्य शासकिय अधिकारी व कर्मचारी यांना शासन निर्णय दि.२२.०४.२०२२ नुसार वैद्यकिय चाचण्या आरोग्य संस्थामध्ये उपलब्ध करण्याकरीता खालील अटींच्या अधिन राहून प्रशासकिय मान्यता देण्यात आली आहे.