केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय; ‘या’ लाभार्थ्यांसाठी सबसीडीची रक्कम वाढवली
केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान 200 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत वाढवले आहे. रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने एलपीजीच्या दरात 200 रुपयांची कपात करण्याची घोषणा मंत्रिमंडळाने केली होती.

आता उज्ज्वला लाभार्थीची सबसिडीची रक्कम 200 रुपयांवरून 300 रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता 600 रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.