Take a fresh look at your lifestyle.

पोलिस प्रशिक्षण केंद्रांतील ८१९ पदे कंत्राटी पद्धतीने भरणार

0

कंत्राटी भरती विरोधात कर्मचारी संघटनांसह विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत असला तरी सरकारने विविध संवर्गात अशा भरतीची प्रक्रिया चालूच ठेवली आहे. विशेषतः मुंबई पोलिस दलात तीन हजार जवानांची कंत्राटी पद्धतीने भरतीचा वाद ताजा असतानाच आता राज्यातील विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 819 पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास गृहविभागाने मान्यता दिली आहे. राज्यभरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रांतील विविध पदांच्या आकृतिबंधास गृहविभागाने मान्यता दिली आहे.