बार्टीमार्फत स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य योजना…
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोग- राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ साठी पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल. योजनेचे स्वरूप :- पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी रक्कम रु. १५,०००/- आर्थिक सहाय्य बाटी मार्फत दिले जाईल.
पात्रता :- १. उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.
२. उमेदवाराचा दि. ०६/०९/२०२३ रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ च्या यादीमध्ये समावेश असावा.
अर्ज करण्यासाठी :- १. बार्टी संस्थेने खालील लिंकवर उपलब्ध करून दिलेल्या अर्जाची प्रिंट काढावी.
२. सदर अर्ज पूर्णपणे भरून अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, उमेदवारांचे बँक खाते क्र. (पासबुकच्या प्रथम पृष्ठाची प्रत ) व महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ चे प्रवेशपत्र (Admit Card) इ. सर्व कागदपत्रांची स्व-साक्षांकित प्रत व अर्ज स्कॅन करून mpscbarti.22@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावेत.
३. कागदपत्र स्व-साक्षांकित असणे बंधनकारक आहे.
अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक :- ३० सप्टेंबर २०२३. पात्र उमेदवारांनी अधिक माहिती साठी ०२०-२६३३३५९६ येथे संपर्क साधावा.
अधिकृत वेबसाईट :-
http://barti.maharashtra.gov.in