Take a fresh look at your lifestyle.

सारथी मार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम…

0

‘सारथी’ संस्थेमार्फत आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटाच्या 18 ते 45 या वयोगटातील महाराष्ट्रातील 20000 उमेदवारांकरिता सारथी संस्थेमार्फत निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लक्षित गटातील पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ खुले करण्यात आले असून, अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरावा. तसेच, उमेदवारांमार्फत, कौशल्य प्रशिक्षण व अभ्यासक्रम मागणी नोंदविण्याकरिता लिंक पुढीलप्रमाणे-

https://kaushalya.mahaswayam.gov.in/users/sarthi.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS), मुंबई यांचे अंतर्गत असणारे सर्व कोर्सेस राबविण्यात येत असून, स्किल इंडिया पोर्टलवर सूचीबद्ध असलेल्या 5-स्टार, 4 स्टार व 3-स्टार रेटिंग असलेल्या प्रशिक्षण संस्थाद्वारे प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र.. निवडीसाठी/ अपेक्षित कोर्ससाठी आपल्याजवळील जिल्ह्यातील सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

अर्ज भरण्यासाठी सारथीचे अधिकृत संकेतस्थळ: http://sarthi-maharashtragov.in > Notice Board > Skill Development Online Application Form