Take a fresh look at your lifestyle.

सोलापूर ग्रामीण रुग्णालयात थेट मुलाखतीद्वारे भरती

0

सोलापूर जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र / ग्रामीण रुग्णालय येथील रिक्त असणा-या वैदयकीय अधिकारी पदांची भरती दर महिन्याच्या तिस-या मंगळवारी घेण्यात येणेबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार माहे सप्टेंबर २०२३ या महिन्यातील तिसरा मंगळवार या दिवशी गणेश चतुर्थी आले कारणाने शासकीय सुटी जाहीर करण्यात आलेली आहे.

त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे एकुण ११ पदे व ग्रामीण रुग्णालय येथे एकुण ६ पदे असे एकुण -१७ रिक्त पदे (बी. ए. एम. एस / एम.बी.बी.एस, पदव्युत्तर पदवी / पदविकाधारक उमेदवार) दिनांक २०/०९/२०२३ रोजी मुलाखतीदवारे (Walk In Interview) भरण्यात येणार आहे. तरी उमेदवारांनी दिनांक – २०/०९/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय सोलापूर येथे आपल्या मुळ कागदपत्रासह उपस्थित रहावे.