बँक, रेल्वे, एल.आय.सी. व स्पर्धा परीक्षेच्या निःशुल्क पूर्व प्रशिक्षणाकरीता महाराष्ट्रातील उमेदवारांनी अर्ज करण्याचे ‘बार्टी’ चे आवाहन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या युवक-युवतीना बँक (IBPS) रेल्वे. एल.आय.सी. इ. व तत्सम स्पर्धा परीक्षांच्या पूर्व तयारी करीता खालील नमूद महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या तसेच विविध शासकीय/निमशासकीय प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
पात्रता
१) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
२) उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा.
३) बँक (IBPS) रेल्वे, एल.आय.सी. इ. व तत्सम स्पर्धा परीक्षांच्या पूर्व तयारी प्रशिक्षणासाठी उमेदवार पदवी उत्तीर्ण असावा.
४) रु. ८ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेला उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असतील.

आरक्षण
• ३०% जागा महिलांसाठी राखीव (अनु. ९ व १० मधील प्रशिक्षण केंद्र वगळून)
• ४ % जागा “दिव्यांग” असलेल्या व्यक्तीसाठी
• ५% जागा अनुसूचित जाती अंतर्गत वंचित जाती मधील (वाल्मिकी व तत्सम जाती-होलार, बेरड, मातंग, मांग, मादगी. ई.) करीता
• एकूण जागांच्या ५% जागा विशेष बाब म्हणून राखीव ठेवण्यात येईल.

चाळणी परीक्षेचे स्वरूप
• बँक (IBPS) रेल्वे, एल.आय.सी. इ. व तत्सम स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर विद्यार्थी निवडी करीता चाळणी परीक्षा घेण्यात येईल. चाळणी परीक्षेची तारीख https://barti.in/ या बार्टी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती
●ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक १०/०९/२०२३
प्रशिक्षण कालावधी ६ महिने
●इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक ३१/०८/२०२३ पासून https://barti.live/barti/ibps/login या लिंकवरुन ऑनलाईन अर्ज सादर करावा.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड, रायगड येथे प्रशिक्षणास इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी https://barti.in या संकेतस्थळावरून Notice Board या सदराखालील “महाड करीता बँक (IBPS) रेल्वे, एल.आय.सी. इ. व तत्सम स्पर्धा परीक्षांच्या पूर्व तयारी करीता अर्ज” या लिंकवरून अर्ज डाऊनलोड करून “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी चौक, काटेश्वरी तळे, महाड रायगड- ४०२३०१” पत्यावर विहित मुदतीत खालील नमूद कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.
निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दरम्यान ७५ टक्के पेक्षा जास्त कालावधी प्रशिक्षणास उपस्थित राहिल्यास विद्यावेतन अदा केले जाईल. वसतीगृहामध्ये प्रवेश मिळाल्यास दरमहा रु.४०००/- एवढे विद्यावेतन अदा करण्यात येईल. तसेच ज्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश उपलब्ध होणार नाही त्यांना विद्यावेतन दरमहा रु.६०००/- अदा केले जाईल. सदर योजनेबाबत/ प्रशिक्षणाबाबत काही वाद अथवा धोरणात्मक पेच/प्रसंग निर्माण झाल्यास याबाबतचे अंतिम सर्व अधिकार मा. महासंचालक, बार्टी व शासनास राहतील.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
●उपरोक्त जाहिरारातीतील नमूद केलेल्या प्रशिक्षणार्थी संख्या कमी जास्त करण्याचे अधिकार मा. महासंचालक यांना राहतील. प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधीमध्ये कोणतीही शासकीय/निमशासकीय खाजगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही. ज्या उमेदवरांनी यापूर्वी बार्टी, पुणे मार्फत (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोग-राज्यसेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, UPSC नागरी सेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आणि बँक (IBPS) रेल्वे, एल.आय.सी. इ. व तत्सम स्पर्धा परीक्षांचे यापूर्वी प्रशिक्षण घेतले असेल त्यांची पुन्हा नव्याने प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार नाही.
उमेदवाराचा प्रशिक्षणाकरीताचा अर्ज
उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायांकित प्रत
पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्राची छायांकित प्रत
जातीच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत
उमेदवाराच्या आधारकार्डची छायांकित प्रत
दिव्यांग असल्यास ४०% पेक्षा जास्त प्रमाणात असलेल्या दिव्यांगत्वाच्या दाखल्याची छायांकित प्रत
उमेदवाराचे सद्यस्थितीत सुरु असलेल्या बँक खात्याच्या पास बुकच्या पहिल्या पृष्ठाची छायांकित प्रत
(सर्व छायांकित प्रती उमेदवाराने साक्षांकित करणे आवश्यक आहे.)