आरोग्य विभाग भरतीत लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची यादी
परिक्षेमध्ये गुणवत्ता यादीत येणा-या उमेदवारांना त्यांचे पदासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे केंद्र/राज्य शासनाचे राजपत्रित अधिकारी / पोस्टमास्तर / मुख्याध्यापक व याबाबत प्राधिकृत व सक्षम अधिकारी यांचेकडून साक्षाकिंत करुन किंवा स्वसाक्षाकिंत प्रती व मूळ कागदपत्रे तपासणी/ पडताळणी वेळी सादर करणे आवश्यक राहील.
1. शैक्षणिक/व्यावसायिक/तांत्रिक अर्हता प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.
2. पदाच्या आवश्यकतेनुसार अनुभव प्रमाणपत्र /शारिरीक क्षमता
3. जातीचा दाखला
4.वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला किंवा माध्यमिक शालांत परिक्षेचे प्रमाणपत्र.
5. उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमिलेअर) सक्षम अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र.
महाराष्ट्राचे (डोमेसाईल्ड) रहिवासी प्रमाणपत्र.
6. जिल्हा रोजगार व स्वंयरोजगार कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी क्रमांक.
7. प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/अंशकालीन/अतिउच्च क्रिडा प्राविण्य गुणवत्ता धारण खेळाडू प्रमाणपत्र / स्वातंत्रय सैनिक नामनिर्देशित पाल्य असल्यास उमेदवारांचे नावे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र.
8. दिव्यांग उमेदवारांचे बाबत जिल्हा शल्य चिकित्सक/वैदयकिय मंडळाचे किमान ४० टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
9. अनाथ असल्याबाबतचे सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र.
10. शासकीय/निमशासकीय कर्मचा-याने त्यांचे अर्ज त्यांच्या विभाग प्रमुखांच्या परवानगीने भरला असल्यास अशा परवानगीचे पत्र.
11. आत्महत्या ग्रस्त शेतकरी यांचे पाल्य असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र. 12. ईडब्ल्यूएस दाखला
इतर आवश्यक ती कागदपत्रे. अर्ज भरताना वरील सर्व (मुळ प्रमाणपत्रांच्या / कागदपत्रांच्या) प्रती उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.