मुक्त विद्यापीठाचे बी.एड. प्रवेश अर्ज करण्याची मुदत १२ सप्टेंबरपर्यंत
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे सेवांतर्गत बी.एड. या शिक्षणशास्त्र शाखेतील अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १२ सप्टेंबरपर्यंत मुदत असेल. अर्जात दुरुस्तीसाठी १३ ते १५ सप्टेंबर अशी मुदत आहे. प्रवेश पात्रतेसंदर्भातील सविस्तर सूचना व प्रवेश वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे. २०२३ ते २०२५ या तुकडीच्या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध सविस्तर तपशील सूचनापत्रात नमूद केला. या प्रणालीचा प्रथमच वापर करणाऱ्या उमेदवारांनी यूजर आयडी व मिळविण्यासाठी नोंदणी पासवर्ड करावी.