Take a fresh look at your lifestyle.

आगामी सण – उत्सवनिमित्त शिधाजिन्नस संच “आनंदाचा शिधा” वाटप करण्याबाबत शासन निर्णय जारी

0

१. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपिएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर व १ लिटर खाद्यतेल या ४ शिधाजिन्नसांचा समावेश असलेला शिधाजिन्नस संच प्रथमतः गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रतिशिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच व तद्नंतर दिवाळी सणानिमित्त प्रतिशिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच याप्रमाणे प्रतिशिधापत्रिका २ शिधाजिन्नस संच स्वतंत्ररित्या ई-पॉस प्रणालीद्वारे ₹१००/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. त्यानुसार गौरी-गणपती उत्सवानिमित्त वितरीत करावयाचा संच दि. ०१ सप्टेंबर, २०२३ पासून ते दि. ३० सप्टेंबर, २०२३ या कालावधीत व तद्नंतरचा दिवाळी सणानिमित्त वितरीत करावयाचा संच दि. १५ ऑक्टोबर, २०२३ पासून दिवाळी सणापर्यंत (दि. १२ नोव्हेंबर, २०२३) वितरीत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

२. पात्र लाभार्थ्यांना गौरी-गणपती उत्सव व दिवाळी सणानिमित्त वितरीत करावयाच्या “आनंदाचा शिधा” संचातील सर्व शिधाजिन्नस (रवा, खाद्यतेल, साखर व चना डाळ) खुल्या बाजारातून खरेदी करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

३.आगामी गौरी-गणपती उत्सवानिमित्त राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना सदर शिधाजिन्नस संच विहीत वेळेत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक शिधाजिन्नस संचांची खरेदी करण्याकरीता सन २०२३ च्या गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इ. सणांनिमित्त निविदेद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या केंद्रीय भांडार, मुंबई या पुरवठादारासोबत करण्यात आलेल्या करारनाम्यास पुर्वीच्याच दराने मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

४.सन २०२३ च्या दिवाळी सणानिमित्त राज्यातील एकूण १,६५,६०,२५६ पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रतिशिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच वितरीत करण्याकरीता आवश्यक शिधाजिन्नस संच खुल्या बाजारातून खरेदी करण्याकरीता NeML NCDEX Group of Company या ऑनलाईन पोर्टलद्वारे निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

५. आगामी गौरी-गणपती उत्सवानिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरीत करण्याकरीता, सन २०२३ च्या गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इ. सणांनिमित्त केंद्रीय भांडार, मुंबई या नियुक्त केलेल्या पुरवठादाराकडून प्राप्त झालेल्या पूर्वीच्या न्युनतम दरानुसार रू.४७५.२८ कोटी व इतर अनुषंगिक खर्च रू.१७.८९ कोटी यासह एकूण रू.४९३.१७ कोटी इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात येत आहे. तसेच, सन २०२३ मधील दिवाळी सणानिमित्त आवश्यक शिधाजिन्नस संचांची खरेदी करण्याकरीता घाऊक बाजारातील अंदाजित दरानुसार रू. ३९५.७९ कोटी व इतर अनुषंगिक खर्च रू.१७.८९ कोटी यासह एकूण रू. ४१३.६८ कोटी इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात येत आहे. अशाप्रकारे आगामी गौरी-गणपती उत्सवानिमित्त तसेच दिवाळी सणानिमित्त नमूद केल्यानुसार एकूण रू.९०६.८५ कोटी इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात येत आहे.

६. उपरोक्त प्रयोजनासाठी येणाऱ्या खर्चास वित्त विभागाने निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

७. सदर खरेदीसाठी येणारा खर्च ४४०८, अन्न साठवण व वखार यावरील भांडवली खर्च ०१ अन्न,१०१ प्रापण व पुरवठा, ०२ प्रापण, वितरण व किंमत नियंत्रण, (०२) (०१) मुंबई शहर – खरेदीची किंमत (अनिवार्य), २१, पुरवठा व सामग्री (४४०८००७७) या लेखाशीर्षाखाली व अनुषंगिक खर्च ४४०८०२६४ या लेखाशीर्षखाली मंजूर अर्थसंकल्पिय तरतुदीतून भागविण्याकरीता मान्यता देण्यात येत आहे.तसेच विक्रीतून जमा होणारी रक्कम लेखाशीर्ष ४४०८०१६६ (मुंबई) व लेखाशीर्ष ४४०८०१७५(मुफसल) यामध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. याचप्रमाणे एकूण होणाऱ्या खर्चामधून जमा होणारी रक्कम वजा जाता येणारी तूट (०३) (०७) अन्न धान्य व्यवहारातील तूटीच्या प्रतिपूर्ती अर्यसहाय्यासाठी अनिवार्य (२४०८०४११) ३३, अर्थसहाय्य लेखाशीर्षाखाली उपलब्ध करून देण्या समान्यता देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय वित्त विभागाने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.२७१/व्यय-१०, दि.२८.०७.२०२३ अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरुन निर्गमित करण्यात आला आहे.