Take a fresh look at your lifestyle.

भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत प्रोत्साहन योजना अंतर्गत युवा शिष्यवृत्ती योजना…

0

भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत प्रोत्साहन योजने अंतर्गत युवा शिष्यवृत्ती योजना या योजने अंतर्गत शास्त्रीय संगीतामध्ये (वादन व गायन) शिक्षण घेणाऱ्या हुशार व गरजू विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन त्यांच्या कलेच्या शिक्षणात मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिष्यवृत्ती प्रतिमाह रु. ५०००/- याप्रमाणे दोन वर्षे असेल. या शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या अटी व शर्ती तसेच विहित नमुन्यातील अर्ज www. mahasanskruti.org या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळ्याखाली भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत प्रोत्साहन योजनेअंतर्गत युवा शिष्यवृत्ती योजना या शिर्षाखाली कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील.

शास्त्रीय संगीतातील निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज दि. ५ ऑगस्ट, २०२३ ते ३ सप्टेंबर, २०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत उपलब्ध असून भरलेले अर्ज त्याच कालावधीत कार्यालयीन वेळेत संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई- ३२ या पत्त्यावर स्वीकारले जातील. त्यानंतर प्राप्त अर्जाचा शिष्यवृत्तीसाठी विचार होणार नाही.