प्लेसमेंटमध्ये करोडोंचे पॅकेज मिळवून देणारे देशातील ‘हे’ टॉप मॅनेजमेंट कॉलेजेस
IIM अहमदाबाद- तुम्हाला मॅनेजमेंटचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही IIM अहमदाबादमध्ये प्रवेश घेऊ शकता. हे कॉलेज गुजरातमध्ये आहे. NIRF रँकिंग २०२२ मध्ये ते प्रथम क्रमांकावर होते. येथे CAT म्हणजेच कॉमन अॅडमिशन टेस्ट परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना प्रवेश दिला जातो.
IIM बंगळूर- मॅनेजमेंट संस्थांमध्ये IIM बंगळूरचे स्थान दुसरे आहे. कॅट परीक्षा उत्तीर्ण करुन IIM, बंगळुरूमध्ये शिक्षण घ्यावे असे तरुणांचे स्वप्न असते. मात्र, येथे फक्त टॉप रँकर्सनाच प्रवेश मिळतो. येथे मॅनेजमेंट विषयातील पीएचडी शिकवली जाते.

IIM कोलकाता- तुम्हाला मॅनेजमेंटचा अभ्यास करायचा असेल तर IIM कोलकाता हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. येथून एमबीए किंवा पीएचडी केलेले तरुण व्यवसाय क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. इथेही फक्त टॉप रँकर्सनाच प्रवेश मिळतो.
IIM दिल्ली- IIM दिल्ली हा तरुणांसाठीही उत्तम पर्याय ठरू शकतो. CAT परीक्षेत चांगले पर्सेंटाइल मिळाले असल्यास तुम्ही येथे प्रवेश घेऊ शकता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर येथील तरुणांना करोडो रुपयांचे पॅकेज मिळते.
IIM कोझिकोड- IIM, कोझिकोड हे केरळमध्ये वसले असून ते पाचव्या स्थानी आहे. येथे देखील कॅट परीक्षेत चांगले टक्केवारी मिळविणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला जातो. तुम्हालाही येथे प्रवेश घ्यायचा असेल, तर ही संस्था तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.