बार्टी मार्फत संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षेच्या (पूर्व व मुख्य ) पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील ३०० उमेदवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेमध्ये संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षेच्या (पूर्व व मुख्य ) पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी पुरस्कृत करण्यात येत आहे. उमेदवारांची निवड करण्याकरिता दि. २७ ऑगस्ट, २०२३ रोजी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) आयोजित करण्यात येत असून त्याकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
इच्छुक पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी www.siac.org.in या संकेतस्थळास भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दि. १४ जुलै, २०२३ ते १४ ऑगस्ट, २०२३. योजनेच्या अधिक माहितीसाठी http://barti.maharashtra.gov.in