Take a fresh look at your lifestyle.

‘या’ योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत शासन निर्णय जारी…

0

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्व लाभार्थ्यांना देण्यात येत असलेल्या रुपये १०००/- इतक्या मासिक अर्थसहाय्यात रुपये ५००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये १५००/- करण्यास याद्वारे शासन मान्यता देत आहे. त्यानुसार १ अपत्य किंवा २ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना देखील अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रु.१५००/- इतकी राहील.

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण / अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतूदीमधून करण्यात यावा. सदर अर्थसहाय्यात वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना लागू होईल.

संदर्भाधीन शासन निर्णयात हयात प्रमाणपत्राच्या तरतूदीमध्ये बदल करण्यात येत असून लाभार्थ्यांनी त

प्रमाणपत्र सादर केल्यास वाटप पूर्ववत करण्यात यावे. तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्याच्या मुलाला नोकरी मिळाल्यानंतर (शासकीय/

निमशासकीय / खाजगी) मुलाचे व कुटूंबाचे उत्पन्न विचारात घेऊन लाभार्थ्याची पात्रता ठरविण्यात यावी. याबाबत संदर्भ क्र.१ येथे नमूद दिनांक २० ऑगस्ट, २०१९ च्या शासन निर्णयातील लाभार्थ्याच्या मुलाची २५ वर्ष वयाबाबतच अट रद्द करण्यात येत आहे.

उपरोक्त योजनांमधील सुधारणेपूर्वीच्या व सुधारणेनंतरच्या अर्थसहाय्याचा तपशील या शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्रात नमूद केला आहे. सदरची अंमलबजावणी शासन निणर्याच्या दिनांकापासून करण्यात यावी.