दिव्यांग स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
जळगाव जिल्ह्यातील दिव्यांगांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांचे स्वावलंबन होण्यासाठी जिल्ह्यात दिव्यांग स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था जळगाव व रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगाव यांच्या सहभागातून जुलै महिन्यापासून सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था महाबळ रोड जळगाव येथे करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांगांना तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना स्वयंरोजगार निर्मीतीसाठी खालील व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
१.शेळी पालन
२.मधुमक्षीका पालन
३.कुक्कुट पालन
४.दुग्ध व्यवसाय आणि गांडुळ खत निर्मीती
५.पेपर कव्हर इन्वलप आणि फाईल बनविणे
६.फास्ट फुड स्टॉल उद्यमी
७.उद्योजकता विकास कार्यक्रम
८.महिला शिवणकाम
९.ब्युटीपार्लर व्यवस्थापन
१०.हलके वाहन चालक
११.रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग दुरुस्ती (फ्रिज आणि ए.सी. दुरुस्ती)
१२.टु व्हीलर मेकॅनिक
१३.फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी
१४.मोबाईल दुरुस्ती आणि सेवा
१५.घरगुती वायरींग फिटींग
१६.इलेक्ट्रीक मोटर रिवाइंडिंग आणि दुरुस्ती सेवा
प्रशिक्षण संस्थेची वैशिष्टे
• प्रशिक्षण कालावधीत लाभार्थ्यांकरीता मोफत अल्पोपहार व भोजन तसेच मोफत निवासाची व्यवस्था
• प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर प्रशिक्षण संस्था तसेच रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातर्फे व्यवसाय उभारण्यासाठी विविध शासकीय कर्ज योजनांबाबत मार्गदर्शन व सहकार्य
• जे दिव्यांग मतिमंद किंवा अतित्रीव प्रकाराचे दिव्यांग असतील अशा लाभार्थ्यांच्या वतीने त्यांचे पालक किंवा घरातील व्यक्ती प्रशिक्षण घेऊ शकतील.
• प्रशिक्षणासाठी प्रवेश अर्ज नि : शुल्क / मोफत आहेत. अर्जासाठी कोणत्याही व्यक्तीस शुल्क देऊ नये.
जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचे स्वावलंबन होण्याच्या उद्देशाने मा.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष तथा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाकांक्षी असा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. सदर प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत प्रत्येक बॅच मध्ये मर्यादीत प्रवेश संख्या असल्याने प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तरी सदर प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी व मोफत अर्जासाठी खालील कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. असे आवाहन रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे
संपर्कासाठी पत्ता
1) रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदीरा समोर, महाबळ रोड जळगाव
2) इंडियन रेडक्रॉस सोसायटी, रेडक्रॉस भवन, सिव्हील हॉस्पिटलच्या बाजुला, नवीन बी. जे. मार्केट जवळ जळगाव
3) सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, पशु वैद्यकीय दवाखाना जवळ, महाबळ रोड, जळगाव
संपर्क क्रः 0257-2994818