वन महोत्सव/वृक्ष लागवड योजनेतंर्गत अनुदानावर मिळणार सर्व प्रकारची रोप व कलम
वन महोत्सव/वृक्ष लागवड योजनेतंर्गत अनुदानावर मिळणार सर्व प्रकारची रोप व कलम…
दि. १५ जून ते ३० सप्टेंबर हा काळ वन महोत्सवाचा काळ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. या कालावधीत वृक्षलागवडीसाठी लोकांना उद्युक्त करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सवलतीच्या दराने
रोपांचा पुरवठा करण्यात येत असतो. वृक्ष लागवड व संगोपन हा लोकांचा कार्यक्रम व्हावा, त्याचबरोबर जनतेला वनीकरणाचे महत्व पटवून देता यावे, या दृष्टीने वन महोत्सवाच्या कालावधीत सुधारीत केलेल्या सवलतीच्या दराप्रमाणे रोपांचा पुरवठा केला जातो.
त्यानुसार संदर्भ क्र. (३) येथील दिनांक २० जून २०२२ च्या शासन निर्णयान्वये सन २०२२-२३ साठी सदर योजना पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली होती. आता सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात सदर योजना चालू ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
सन २०२२-२३ या वर्षातील अनुभव तसेच जनतेचा प्रतिसाद लक्षात घेवून, ही योजना सन २०२३ २४ या आर्थिक वर्षात दिनांक १५ जून, २०२३ ते ३० सप्टेंबर, २०२३ या वन महोत्सवाच्या कालावधीत पुढे चालू ठेवण्यास व ती प्रभावीपणे राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

राज्यात सन २०१७ पासून ” ५० कोटी वृक्ष लागवड” हा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम अखंडपणे पुढे ही चालू राहावा व या कार्यक्रमांतर्गत खाजगी मालकीचे पडीक क्षेत्र आणि शेत बांधावर, रेल्वे दुतर्फा कालवा दुतर्फा तसेच रस्ता दुतर्फा क्षेत्रात, सामूहीक पडीक क्षेत्र, व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेता यावा तसेच सर्व शेतकरी व वृक्षप्रेमी यांना अल्पदरात रोपे उपलब्ध व्हावीत यासाठी वन महोत्सवाच्या कालावधीत सवलतीच्या दरात रोपांचा पुरवठा करण्यात येईल. चालू पॉलिबॅगचे आकारमान मिश्रण वर्षी रोपे निर्मिती करतेवेळी, बियाणांचा, रोपांची विरळणी, रोपांची सुदृढता या सर्व मानकांचा विचार करून रोपे तयार करण्यात येत असल्यामुळे त्याप्रमाणे रोपांची प्रतवारी निश्चित करून वन महोत्सवाच्या कालावधीत आणि सर्वसाधारण कालावधीत रोपांचा पुरवठा सन २०२३ – २४ याआर्थिक वर्षात खाली नमूद केलेल्या सवलतीच्या दराप्रमाणे करण्यास मान्यता देण्यात येत आहे.