Take a fresh look at your lifestyle.

कृषी पदवीसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू

0

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) मार्फत राज्यातील कृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांतील नऊ पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जाणार असून, दि ९ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.

राज्यातील कृषी विद्यापीठांमधील बी.एस्सी. (ऑनर्स) (कृषी), बी.एस्सी. (ऑनर्स) (उद्यानविद्या), बी.एस्सी. (ऑनर्स) (वनविद्या), बी. एफ्.एस्सी. (मत्स्यविज्ञान), बी. टेक. (कृषी अभियांत्रिकी), बी. टेक. (अन्नतंत्रज्ञान), बी. टेक. (जैवतंत्रज्ञान), बी.एस्सी. (ऑनर्स) (सामुदायिक विज्ञान) आणि बी. एस्सी. (ऑनर्स) (कृषी व्यवसाय व्यवस्थापन) या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांना पहिल्या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यात शासकीय तसेच अनुदानित ३ हजार ३६२ आणि विनाअनुदानित कॉलेजमधील १२ हजार ६९० रिक्त जागा आहेत.

केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रवेश अर्ज करण्यासाठी पात्रता परीक्षेमध्ये (इयत्ता १२वी विज्ञान) खुल्या गटातील उमेदवारास ५० टक्क्यांपेक्षा कमी आणि आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवाराला ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण नसावेत. प्रवेश प्रक्रिया व शैक्षणिक शुल्क याबाबत अधिक माहितीसाठी https://ug.agriadmissions.in/ व https://ug.agriadmissions.in/Downloads/2023-24/Prospectus Marathi.pdf या संकेतस्थळास भेट द्यावी.

कृषी पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत : ९ जुलै

■ तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : १३ जुलै सायं. ५.३० नंतर)

■ हरकती व तक्रारी करणे : १४ ते १६ जुलै

■ नोंद घेतलेल्या हरकतींची यादी प्रसिद्ध करणे : १८ जुलै सायं. ५.३० नंतर)

■ अंतिम गुणवत्ता यादी : २० जुलै (सायं. ५.३० नंतर) पहिल्या फेरीची निवड यादी : २२ जुलै सायं. ५.३० नंतर)

■ दुसऱ्या फेरीची निवड यादी : २७ जुलै सायं. ५ नंतर)

■ तिसऱ्या फेरीची निवड यादी : २ ऑगस्ट (सायं. ५.३० नंतर)

■ प्रवेश निश्चित झालेल्या महाविद्या- लयात मूळ कागदपत्रे सादर करणे व शुल्क भरणे : ३ ते ६ ऑगस्ट

■ रिक्त जागांसाठी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया : ९ ते १४ ऑगस्ट

■ संस्थानिहाय कोटा प्रवेश : १० ते २० ऑगस्ट