विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; कोतवाल पदभरतीत महसूल विभागाने केले ‘हे’ मोठे बदल….
कोतवाल पदभरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. सध्या कोतवाल पदभरती जाहीर झालेली आहे. मात्र, या कोतवाल पदभरतीत महसूल विभागाने मोठे बदल केले आहेत. त्यामुळे या भरतीत नेमकी काय बदल करण्यात आलेत, हे जाणून घेणं विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं आहे. राज्यातील महसूल विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या कोतवालपदाच्या पदभरतीत बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी दोन टप्प्यात घेण्यात येणारी परीक्षा आता 100 गुणांची एकाच टप्प्यात घेत मुलाखत रद्द करण्यात आली आहे.
कोतवाल हे पद मानधन तत्वावरील आहे. हे पद शासकीय कर्मचारी म्हणून नाही. यासाठी वयोमाऱ्यादा 18 ते 40 असून 10 वी पास शिक्षण हे ग्राह्य धरले जाते.
यापूर्वी कोतवाल पदासाठी पाच हजार मानधन होते. 2019 ला यामध्ये वाढ करून 7500 करण्यात आले. त्यानंतर पुन्हा या मानधनात वाढ करण्यात आली. आता 15000 रुपये मानधन करण्यात आले आहे.
कोतवाल पदासाठी लेखी परीक्षा एकूण 100 गुणांची होणार आहे. तर 50 प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे विचारले जाणार आहेत. एक प्रश्न दोन मार्कासाठी असणार आहे, अशी माहिती महसूल विभागाने शाषन निर्णयाद्वारे जाहीर केले आहे.

दरम्यान, कोतवाल हा गावातील तलाठी यांनी सांगितलेली कामे तसेच गौणखनिज देखरेख करतो. कोतवालाची नेमणूक तहसीलदार करतात. प्रत्येक साझासाठी एक कोतवाल असतो. कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार तहसीलदाराला आहेत.