Take a fresh look at your lifestyle.

स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! बार्टी प्रशिक्षणासाठी अर्जाची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

0

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार दिनांक 28 ऑक्टोबर 2021 च्या शासन निर्णयास अनुसरून राज्यात व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. बार्टी मार्फत अनुसूचीत जातीच्या उमेदवारांना विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी प्राप्त होण्याकरिता खालीलप्रमाणे दोन प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जात आहेत. प्रशिक्षणास अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

1.बँक, रेल्वे, एलआयसी ई व तत्सम Aptitude Test वर आधारीत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण

प्रशिक्षण कालावधी: 6 महीने पात्रता: किमान 12वी.

2.पोलिस व मिलिटरी भरती परीक्षा प्रशिक्षण

प्रशिक्षण कालावधी: 4 महीने पात्रता : किमान 10वी

विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 6000/- रुपये स्टायपंड, मोफत अभ्यास साहित्य. पोलिस भरतीच्या विद्यार्थ्यांना 3000/- रुपये बूट व इतर साहित्य घेण्याकरिता अतिरिक्त मिळतील.

अधिक माहिती करिता आपल्या नजिकच्या केंद्राला संपर्क करा. काही जिल्ह्यांचे संपर्क क्रमांक खाली दिलेले आहेत

औरंगाबाद – 8055150242

भंडारा – 9579297744

बुलडाणा – 8983644574

गडचिरोली – 7796187391

हिंगोली – 7479727777

जालना – 8055150243

नवी मुंबई – 8830988391

परभणी – 9822944347

विरार – पालघर – 9768998194

रत्नागिरी – 8149109572

सातारा – 9503726193

सांगली – 9960304482

वर्धा – 8956311689