मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय…
▪️ सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तात्काळ मदत करणार. या मदतीसाठी 1500 कोटीची मान्यता मिळाली.
▪️ कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात भरघोस वाढ करण्याचा घेतला महत्वपूर्वपूर्ण निर्णय. या निर्णयामुळे आता ग्रामसेवकांना मिळणार 16 हजार रुपये.
▪️ अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यामध्ये केंद्राप्रमाणे सुधारणा.
▪️ पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ.
▪️ लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार.
▪️ पुणे येथे 4 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार.▪️

अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ.
▪️मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृहे योजना.
▪️ स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादेत वाढ.
▪️ चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार.