Take a fresh look at your lifestyle.

‘या’ प्रवर्गासाठी ‘वाहन चालक’ प्रशिक्षण योजना…

0

योजनेचे नाव:- विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी वाहन चालक प्रशिक्षण योजना

योजनेचा प्रकार:- राज्यस्तरीय योजना

योजनेचा उद्देश:- मोटार वाहन चालक प्रशिक्षण ही योजना शासन निर्णय क्र. इबीसी-1970/121397-जे, दि.7.9.1972 अन्वये विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या उमेदवारांना लागू करण्यात आली.

सदर योजनेत सुधारणा करुन शासन निर्णय क्र. संकीर्ण/1095/ प्र.क्र.57/ मावक-2, दि.26/7/1995 व दि.23.7.2009 आणि शासन शुध्दीपत्रक दि.30 जुलै, 2009 नुसार युवक व युवतींना वाहन चालक व वाहक प्रशिक्षण देण्याची येाजना मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेमार्फत राज्यातील सर्व जिल्हयात राबविण्यात येते. त्याकरिता प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस शासन निर्णय दि.27.2.2013 नुसार रक्कम अदा केली जाते.

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव:- विमुक्त जाती/ भटक्या जमाती/ इतर मागासवर्ग / विशेष मागास प्रवर्ग

योजनेच्या अटी:- उमेदवार विजाभज /इमाव व विमाप्र प्रवर्गाचा असावा. उमेदवार हा वाहन प्रशिक्षणासाठी मोटार परिवहन अधिनियमातील तरतुदीनुसार वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता शारीरिक पात्रता, इत्यादि बाबींची पूर्तता करणारा आसावा.

प्रशिक्षण कालावधीमध्ये जिल्हा कार्यालय ते प्रशिक्षण केंद्रापर्यंत जाणे येण्याचे भाडे, आरोग्य तपासणी, छायाचित्र, चालकाचा कच्चा व पक्का परवाना, वाहक परवाना व बिल्ला, राहण्याची व जेवण्याची व्यवस्था इत्यादि संबंधित प्रशिक्षण संस्थेमार्फत केली जाते.

दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप:- प्रशिक्षण केंद्राच्या मुख्यालयी राहणारा स्थानिक प्रशिक्षणार्थी वसतिगृहात रहात नसल्यास मोटार वाहन चालक प्रशिक्षणार्थीस रु.300/- व वाहक प्रशिक्षणार्थ्यास रु.150/- याप्रमाणे प्रशिक्षण काळात विद्यावेतन देणे प्रशिक्षण संस्थेवर बंधनकारक राहील.

अर्ज करण्याची पध्दत:- संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज करावा.

संपर्क कार्यालयाचे नाव:- संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण