दहावी बारावीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘या’ शिष्यवृत्तीसाठी आजच अर्ज करा
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून विभागीय बोर्ड, तालुका, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम आलेल्या अनुसूचित जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार देण्यात येतो. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.