Take a fresh look at your lifestyle.

सुवर्णसंधी; भारतीय रेल्वेमध्ये ‘यांच्यासाठी’ १५ टक्के जागा राखीव

0

रेल्वे मंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्तर १ मधील चतुर्थ श्रेणीमध्ये म्हणजे गँगमन, ट्रॅकमन, खलाशी, पॉइंटमॅन आदी रिक्त पदांवर अग्निवीरांना १० टक्के आरक्षण दिले जाईल. तसेच, स्तर-२ मध्ये ज्युनिअर क्लार्क, टायपिस्ट, अकाऊंटंट, ज्युनिअर टाइम कीपर, ट्रेन क्लार्कसहित बिगर राजपत्रित रिक्त पदांवर पाच टक्के आरक्षण मिळेल. तसेच, स्तर १मधील रिक्त पदे रेल्वे भरती सेलमधून भरले जातील. स्तर-२मधील पदांची भरती प्रक्रिया आरआरबी आयोजित करेल.

अग्निवीरांना लिखित परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल. मात्र त्यांना शारीरिक चाचणीमधून सवलत मिळेल. पहिल्या बॅचमधील अग्निवीरांच्या वयोमर्यादेत पाच वर्षांची सवलत मिळेल. त्यानंतरच्या बॅचमधील अग्निवीरांना वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट मिळेल. या राखीव कोट्यामध्ये जर अपेक्षित अग्निवीरांचे अर्ज न आल्यास दुसऱ्या आरक्षित वर्गातील तरुणांना संधी दिली जाईल.

सीआयएसएफमध्ये महिला कॉन्स्टेबलच्या भरतीचा विचार:– सीआयएसएफमध्ये पुरुषांच्या समकक्ष कॉन्स्टेबल/चालक आणि कॉन्स्टेबल/चालक-सह-पंप ऑपरेटरच्या पदासाठी महिलांची भरती करण्याचा विचार केला जात आहे. केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात ही माहिती दिली. केंद्र सरकारने भरती नियमांची संशोधनप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आठ आठवड्यांची मुदत मागितली आहे.