Take a fresh look at your lifestyle.

दिव्यांग कल्याण विभागातील भरती संदर्भात नवीन GR जाहिर

0

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या “दिव्यांग कल्याण विभागासाठी” उच्चस्तरीय समितीने प्रथम टप्प्यात ४२ (३२ व १० बाह्यस्त्रोत) पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. सदर पदे निर्माण करण्यास काही कालावधी लागणार आहे. ही बाब विचारात घेता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या आस्थापनेवरील खालील अधिकारी कर्मचारी केवळ तात्पुरत्या स्वरुपात दिव्यांग कल्याण विभागास उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

दिव्यांग कल्याण १ व २ या कार्यासनाचे पर्यवेक्षकीय कामकाज पाहणारे श्री. वि. पुं. घोडके, उपसचिव व श्री. रा. भा. गायकवाड, अवर सचिव हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे नियमित कामकाज सांभाळून दिव्यांग कल्याण विभागाचे कामकाज पुढील आदेश होईपर्यत पाहतील. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या आस्थापनेवरील तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध करुन दिलेला कमर्चारी/ अधिकारी वृंद हे आस्थापनेवर राहून दिव्यांग कल्याण विभागाचे कामकाज हाताळतील.

विभागास आवश्यक असणारे मान्यतेच्या मर्यादेत बाह्यस्त्रोताव्दारे भरावित.

सदर नव्याने निर्माण झालेल्या विभागासाठी स्वतंत्र लेखाशिर्ष, जागा, बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावायच्या सेवा इत्यादी बाबतची कार्यवाही सुरु आहे. यास काही कालावधी लागणे अपेक्षित आहे, तोपर्यंत संबंधित उप सचिव यांनी सचिव दिव्यांग कल्याण यांच्या सल्यानुसार नवनिर्मित विभागाच्या आस्थापना व इतर सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी दिव्यांग कल्याण-१ व दिव्यांग कल्याण-२ कार्यासनातील अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या सेवा वापरतील.

तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी दिव्यांग कल्याण विभागाच्या संचिका दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव व विभागाचे मा. मंत्री महोदय, (दिव्यांग कल्याण विभाग यांच्याकडे सादर करावयत व सामाजिक न्याय विभागाच्या संचिका सामाजिक न्याय विभागाचे सचिव व विभागाच मा. मंत्री महोदय यांच्याकडे सादर कराव्यात.

लिपिक-टंकलेखक, वाहन चालक व शिपाई ही पदे १० पदांच्या सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरउपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२३०११३१६१५१६२९२२ असा आहे. तसेच सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने निर्गमित करण्यात येत आहे.