स्वर्णिमा योजना; राष्ट्रीय महामंडळाची योजना…
1. योजनेचे नाव- स्वर्णिमा
2. योजनेचा प्रकार- राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली या राष्ट्रीय महामंडळाची योजना.
3. योजनेचा उद्देश- महिला लाभार्थींना स्वयंरोजगाराकरीता कर्ज उपलब्ध करुन देणे.
4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव- इतर मागास प्रवर्ग (O.B.C.)
5. योजनेच्या प्रमुख अटी- अर्जदार इतर मागासवर्गीय असावा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा. वय 18 ते 50 वर्ष असावे.संपूर्ण कुटूंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण भागासाठी रु.98,000/- व शहरी भागासाठी रु.1,20,000/-
6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप- अल्प व्याज दराने महिला लाभार्थींना कर्ज पुरवठा.
7. अर्ज करण्याची पध्दत- विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावे लागतात.
8.संपर्क कार्यालयाचे नाव- महामंडळाचे संबंधीत जिल्हा कार्यालय.