Take a fresh look at your lifestyle.

वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करणेबाबत शासन परिपत्रक जारी….

0

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६.

क्रमांक जमीन-२०२२/प्र.क्र.१७०/ज- १. – महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ महा. अधि. ४१ ) च्या कलम २९अ आणि कलम ३२८, अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व त्याबाबत समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून

“महाराष्ट्र जमीन महसूल ( भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करणे) नियम, २०१९” यामध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालील नियम करण्याचे योजिले आहे. उक्त संहितेच्या कलम ३२९, पोट-कलम (१) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे, सदर नियम पूर्व प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.

१. या नियमांना, “महाराष्ट्र जमीन महसूल ( भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करणे) (सुधारणा) नियम, २०२३” असे म्हणावे.

२. “महाराष्ट्र जमीन महसूल ( भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करणे) नियम,२०१९ (ज्यांचा यापुढे “प्रमुख नियम” ‘ म्हणून उल्लेख केलेला आहे.) च्या नियम ३ मध्ये खालील सुधारणा करण्यात येत आहे.

(१) उप-नियम (१) मधील “भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या” या मजकुराऐवजी “भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीच्या प्रदानानंतर, त्या जमिनीचा मूळ मंजूर प्रयोजनार्थ प्रत्यक्ष वापर सुरू होऊन, ५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच त्या”, हा मजकूर दाखल करण्यात येईल.

(२) उप-नियम (४) मध्ये,

(१) तक्त्यापूर्वी खालील परंतुक समाविष्ट करण्यात येत आहेत

“परंतु, भोगवटादार वर्ग-२ अथवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीचे रूपांतरण करण्यासाठीच्या अधिमूल्याची रक्कम रू. १ कोटीपेक्षा अधिक येत असेल, अशा प्रकरणी राज्य शासनाची पूर्वमान्यता (जमीन प्रदान केलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून) घेतल्या खेरीज, जिल्हाधिकारी, अशा

जमिनींचे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरणाचे कोणतेही आदेश पारीत करू शकणार नाहीत.”

“परंतु आणखी असे की, भोगवटादार वर्ग – २ अथवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या शासकीय जमिनींच्या,

अशा विवक्षित प्रकरणी मूळ मंजूर प्रयोजनासाठीचा प्रत्यक्ष वापर सुरू केल्याच्या दिनांकापासून ५ वर्षांचा

कालावधी पूर्ण झाल्याखेरीज, जिल्हाधिकारी, अशा जमिनींचे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरणाचे कोणतेही

आदेश पारीत करू शकणार नाहीत.”

(२) तक्त्यामध्ये –

(अ) परिच्छेद (अ) –

(१) रकाना क्रमांक (३) येथील शीर्षकामध्ये ‘तीन वर्ष ‘ या मजकुराऐवजी ‘पाच वर्ष ‘ हा मजकूर दाखल करण्यात येईल.

(२) रकाना क्रमांक (४) येथील शीर्षकामध्ये ‘तीन वर्ष’ या मजकुराऐवजी ‘पाच वर्ष’ हा मजकूर दाखल करण्यात येईल.

(ब) परिच्छेद (ब) –

(१) रकाना क्रमांक (३) येथील शीर्षकामध्ये ‘तीन वर्ष’ या मजकुराऐवजी ‘पाच वर्ष’ हा मजकूर दाखल करण्यात येईल.

(२) रकाना क्रमांक (४) येथील शीर्षकामध्ये ‘तीन वर्ष’ या मजकुराऐवजी ‘पाच वर्ष’ हा मजकूर दाखल करण्यात येईल.

उक्त प्रमुख नियमांमधील अधिमूल्याची रक्कम समायोजित करण्याबाबतचा नियम ४ हा वगळण्यात येत आहे.