महाराष्ट्र नगर रचना विभागाची भरती अपडेट…
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांचा आढावा घेऊन, संदर्भीय क्र.२ येथील दि.०१.०३.२००६ रोजीच्या शासन निर्णयान्वये एकूण ११७६ पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे.
विभागाच्या दि.०१.०३.२००६ च्या आकृतीबंधात तद्नंतर वेळोवेळी करण्यात आलेल्या पद निर्मिती / पद निरसन यामुळे झालेला बदल विचारात घेऊन, वित्त विभागाच्या दि.२९.०६.२०१७ रोजीच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांनुसार, नगर विकास विभागाच्या अधिपत्याखालील नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांचा सर्वंकष आढावा घेण्यात आला.
मा. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दि. १३.१२.२०२२ रोजी झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या (५/२०२२) बैठकीत नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील ११४८ नियमित पदे व बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाचे एकूण ५१ मनुष्यबळ / सेवा याप्रमाणे सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे.