PLI योजनेद्वारे स्मार्टफोन निर्मितीतून मिळणार दीड लाखांवर नोकर्या
केंद्र सरकारच्या उत्पादनावर आधारित प्रोत्साहन अर्थात् PLI Scheme पीएलआय योजनेच्या माध्यमातून चालू आर्थिक वर्षात फोन निर्मितीत सुमारे दीड लाख नवीन नोकर्यांची अपेक्षा अहवालात वर्तविण्यात आली आहे.
सरकारकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमुळे चीनबाहेर उत्पादनासाठी जागतिक बदल आणि केंद्राच्या पीएलआय योजनेमुळे ही बाब शक्य होत आहे.
सॅमसंग, नोकिम फॉक्सकॉन, विस्ट्रॉन, पेगाट्रॉन, टाटा ग्रुप आणि सॅलकॉम्प यासार’या मोठ्या कंपन्या देशात त्यांचे कर्मचारी वाढवतील, असे या अहवालात म्हटले आहे.
नोकरभरतीत वाढ – टीमलीज सर्व्हिसेसच्या स्टाफिंगचे सीईओ कार्तिक नारायण यांनी इकॉनॉमिक टाईम्सला सांगितले, बहुतेक मोबाईल ब्रॅण्ड आणि त्यांचे घटक उत्पादन आणि असेंब्ली पार्टनर, ज्यांच्याकडे भारतात आधीपासून काही प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग आहे तसेच ते नव्याने स्थापन करण्याचा विचार करीत आहेत, त्यांनी भरती वाढवली आहे.

सरकारची PLI Scheme पीएलआय योजना आणि अनेक कंपन्यांचे उत्पादन भारतात हलवण्याच्या दीर्घकालीन नियोजनातून प्रथम स्थानिक बाजारपेठ काबीज करून उत्पादन वाढवण्याचे नियोजन आहे. त्यानंतर उर्वरित जगाला मोठ्या प्रमाणात निर्यात करण्याचे उद्दिष्ट असेल. यामुळे या क्षेत्रात नोकर्यांच्या निर्मितीसाठी मदत होईल.