Take a fresh look at your lifestyle.

मध्य रेल्वे मुंबई मार्फत भरती

0

भारतीय मध्य रेल्वे यांच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त अधिकारी पदाच्या एकूण 10 जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक 27 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता– उपमुख्य कार्मिक अधिकारी (बांधकाम) मुख्य प्रशासकीय अधिकारी यांचे कार्यालय (बांधकाम) नवीन प्रशासकीय इमारत, 6 मजला अंजुमन इस्लाम शाळेसमोर, डी.एन. रोड, मध्य रेल्वे, मुंबई, पिनकोड- 400001