Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा सैनिकी वसतिगृहात हंगामी पदांची भरती

0

जिल्हा सैनिक कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था व सैनिकी मुलांच्या वसतिगृहासाठी अशासकीय कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक, माजी सैनिक आणि नागरी उमेदवारांनी १० एप्रिलपर्यंत अर्ज करायचे आहेत.

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी ही माहिती दिली. महिला शारीरिक शिक्षण निदेशकांच्या दोन पदांसाठी बी. पीएड्., एम. पीएड्., एन. सी. सी., ‘सी कीर्ट क्वॉलीफाईड’, तर पुरुषांच्या एका शिपाई पदासाठी आणि पुरुष ग्राऊंडस्मनच्या एका पदासाठी दहावी उत्तीर्ण, माजी सैनिक व इतर अशी शैक्षणिक पात्रता आवश्‍यक असेल. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक येथे अर्ज सादर करायचे आहेत. माहितीसाठी जिल्हा सैनिक कार्यालयाच्या (०२५३) २५७७२५५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

या भरतीबाबतच्या अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाच्या (०२०)-२६१२२२८७ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा वसतिगृह अधीक्षक शेख अब्दुल यांच्या ७०२०४१०९५४ या आणि वसतिगृह अधीक्षिका अनिता पाटेकर यांच्या ९४०४५८१९४७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सासने यांनी केले आहे.