Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगावर सदस्य पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

शैक्षणिक पात्रता- उमेदवारास अभियांत्रिकी, वित्त, वाणिज्य, अर्थशास्त्र, कायदा किंवा व्यवस्थापन या संबंधातील समस्या सोडविण्याचे पुरेसे ज्ञान किंवा अनुभव किंवा सामर्थ्य आहे, अशी क्षमता, सचोटी व पात्रता असावी.

वय- उमेदवाराचे कमाल वय ६५ वर्षांहून अधिक नसावे.

पदाचा कालावधी- नियुक्ती स्वीकारल्यापासून ५ वर्षे किंवा ६५ वर्षे होईपर्यंत जे आधी होईल तोपर्यंत.

अटी व शर्थी- सदस्य म्हणून नेमणूक झाल्यानंतर उमेदवारास बाहेर इतरत्र कोठेही अन्य नोकरी करता येणार नाही.

अर्ज करण्याची पद्धत- इच्छुकांनी आपले अर्ज नाव, पत्ता, जन्मतारीख, वय, शैक्षणिक अर्हता, अनुभव, सध्याचे अगर पूर्वी धारण केलेले पद वेतन इ. तपशिलासह व आवश्यक प्रमाणपत्रांच्या प्रतीसह प्रधान सचिव (ऊर्जा) यांच्याकडे वरील ई-मेल पत्त्यावर दि. २१ एप्रिल २०२३ रोजी किंवा तत्पूर्वी मिळतील अशा बेताने पाठवावेत.

अधिक माहितीसाठी- उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मंत्रालय (मुख्य इमारत), तिसरा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई – ४०० ०३२

दूरध्वनी क्र. ०२२-२२८८३४१३

E-mail ID : energyad-mh@mah.gov.in