जीवनात माणूस किती नाती जोडतो आणि किती गमावतो; जाणून घ्या मानसशास्त्र काय सांगते
प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य नातेसंबंधांवर अवलंबून असते. रोजच्या आयुष्यात व्यक्तीला प्रत्येक टप्प्यात नव-नवीन माणसं भेटतात आणि त्यांच्यासोबत नवीन नाती तयार होतात. एक व्यक्ती जन्माला आपल्यापासून आई-वडिल बहिण, भाऊ आणि नंतर एक एक करून सर्व नाती तयार होत जातात. आयुष्यभरात एक माणूस किती नाती जोडतो आणि किती गमावतो? याबद्दल मानसशास्त्र काय सांगते ते पाहुयात…
तर एक व्यक्ती तिच्या आयुष्यात जास्तीत जास्त 150 लोकांच्या चांगल्या संपर्कात असते किंवा त्यांच्याशी खास संबंध असतात. यानुसार आपल्या आयुष्याच्या वर्तुळात केवळ 1 ते 5 व्यक्ती अशा असतात ज्यांच्या चांगल्या- वाईट वागण्याचा किंवा त्यांच्या असण्या-नसण्याचा आपल्याला खूप फरक पडतो.
यानंतर आपल्या आयुष्यात अशा 15 व्यक्ती असतात ज्यांना आपण आपले चांगले मित्र मैत्रिणी मानतो. तसेच 50 व्यक्ती अशा असतात त्यांच्याशी फक्त कामाशी काम ठेवतो. यालाच मीनिंग फुल कॉन्टॅक्ट असे म्हणतात.
तसेच एका व्यक्तीच्या आयुष्यात वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत जवळचे नातेसंबंध तयार झालेले असतात. ज्यामध्ये केवळ 1 ते 5 जणचं असतात. यात जोडीदार, मुलं, पालक किंवा मित्र-मैत्रिणी यांचा समावेश असू शकतात. वाढत्या वयाबरोबर नात्याचे वर्तुळ लहान होत जाते. त्यामुळे एक व्यक्ती जेव्हा वयाची सत्तरी ओलांडतो तेव्हा त्यासोबत केवळ 1 ते 2 लोक असतात.
यानंतर येते आपल्या आयुष्यातील अगदी खास नाते ते म्हणजे जोडीदार, प्रियकर- प्रियसी. या नात्यांमध्ये आल्यानंतर आपण आपले चांगले दोन मित्र किंवा मैत्रिणी गमावलो. कारण हे खास नातं टिकवण्यासाठी आपण आपले सर्व लक्ष आणि शक्ती वापरत असतो.