बँक, रेल्वे, एलआयसी, पोलीस, सैन्य भरतीसाठी मोफत प्रशिक्षण व शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरु
सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी 30 ऑक्टोबर रोजी केलेल्या घोषनेनुसार, अनुसूचित जातीच्या मुला मुलींसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम बार्टीमार्फत राज्यातील 30 केंद्रावर राबवण्यासंदर्भात बार्टीकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) मार्फत राज्यातील 30 केंद्रावर बँक, रेल्वे, एलआयसी, पोलीस, सैन्य भरती, बँक, रेल्वे, एलआयसी, पोलीस, सैन्य भरती, बँक, रेल्वे, एलआयसी, पोलीस, सैन्य भरती, कार्पोरेट क्षेत्रातील नोकरीच्या संधी या अनुषंगाने विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्व तयारीसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार बार्टी मार्फत 30 केंद्राच्या विस्तृत माहितीसह पात्र विद्यार्थी विद्यार्थिनींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. बार्टी मार्फत राज्यातील 30 केंद्रावर बँक, रेल्वे, एलआयसी, पोलीस, सैन्य भरती, कार्पोरेट क्षेत्रातील नोकरीच्या संधी अनुषंगाने लेखी परीक्षा, मुलाखतीच्या तयारीसाठी विशेष अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी संबंधित केंद्रावर 9 डिसेंबर 2021 पूर्वी संबंधित केंद्रावर अर्ज सादर करण्यात यावे. असे आवाहन बार्टीचे धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षात दोन सत्रात मिळून 18 हजार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षण कालावधी दरम्यान विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये प्रतीमहा प्रमाणे विद्यावेतन तसेच पोलीस भरती व तत्सम तयारी करणाऱ्यांसाठी बूट व अन्य साहित्य खरेदीसाठी एकरकमी 3 हजार रुपये देण्यात येईल. प्रत्येक प्रशिक्षण केंद्रावरून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी व त्यातून प्रत्यक्ष नोकरी मिळालेले विद्यार्थी यांच्या प्रमाणावरून संबंधित केंद्राचा दर्जा ठरविण्यात येईल. तसेच आवश्यकता भासल्यास प्रशिक्षण केंद्राची संख्या वाढविण्यात येईल. इच्छुक व पात्र असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ठराविक वेळेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी बँक, रेल्वे, एलआयसी, पोलीस, सैन्य भरती आदीसाठी निशुल्क अनिवासी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
बँक, रेल्वे, एलआयसी, ई. प्रशिक्षण व शिष्यवृत्तीसाठी पात्रता, अटी/शर्ती व आवश्यक कागदपत्रे
प्रत्येक प्रशिक्षण केंद्रामध्ये 150 अनुसूचित जातीचे विद्यार्थी निवड केले जातील. 20 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी ठेवण्यात येईल. त्यामध्ये 30 टक्के जागा महिलांसाठी, 4 टक्के जागा दिव्यांग व्यक्तीसाठी राखीव राहील.
पात्रता
महाराष्ट्र राज्याचा अनुसूचित जातीचा उमेदवार असावा. अर्जदाराचे वय 18 ते 34 पर्यंत असावे. अर्जदार किमान 12वी उत्तीर्ण अथवा पदवीधर असावा.
- प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती
1)प्रशिक्षण केंद्राकडे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 9/12/2021
2)प्रशिक्षण कालावधी 6 महिन्यांचा राहील.
3)विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसहीत अर्ज दाखल केलेल्या पात्र उमेदवारांची चाळणी परीक्षा संस्थेमार्फत दिनांक 12/12/2021 रोजी सकाळी 10:30 घेण्यात येईल. त्या आधारे उमेदवारांची गुणानुक्रमे कोचिंग साठी निवड करण्यात येईल.
4)प्रशिक्षण कोचिंग क्लास दिनांक 15 डिसेंबर 2021 दरम्यान सुरु करण्यात येईल.
5) निवड झालेल्या पैकी पात्र विज्ञार्थी प्रशिक्षणाकरिता रोज 3 तास त्यापैकी जास्त कालावधी करिता उपस्थित राहील. तसेच एकूण दरमहा 75 टक्के पेक्षा जास्त कालावधी प्रशिक्षणास उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 6 हजार रुपये विद्यावेतन राहील.
6) विद्यार्थ्यांना 5 हजार रुपये एवढ्या किंमतीचे निशुल्क अभ्यास साहित्य व पुस्तकांचा संच बार्टी द्वारे प्रशिक्षण केंद्रामार्फत देण्यात येईल.
7) सदर प्रशिक्षण कार्यक्रम 30 प्रशिक्षण केंद्रामार्फत राबविण्यात येणार आहे. तरी त्या त्या जिल्ह्यांमध्ये कोचिंग घेण्यासाठी इच्छुक अनुसूचित जातीमधील उमेदवार त्या जिल्ह्यातील संबंधित प्रशिक्षण केंद्रावर जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील.
8)विहित नमुन्यातील अर्ज प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयातून किंवा बार्टी पुणे या संस्थेच्या वेबसाईट वरून भरता येईल. अधिक माहितीसाठी प्रशिक्षण केंद्राची संपर्क साधावा.
9) ज्या उमेदवारांनी यापूर्वी बार्टी पुणे मार्फत बँक, रेल्वे, एलआयसी इत्यादी प्रशिक्षण घेतले असेल त्यांना आता प्रशिक्षण घेता येणार नाही.
10) दिनांक 29/2/2020 रोजी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने बँक, रेल्वे, एलआयसी इत्यादी स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केला असेल अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा नव्याने प्रशिक्षण केंद्राला अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
1) उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
2) जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत
3) 12 वी उत्तीर्ण अथवा कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण
4) शाळा सोडल्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत
5) उमेदवाराचे आधार कार्ड साक्षांकित प्रत
6) दिव्यांग असल्यास 40 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात असलेल्या दिव्यांगत्त्वाचा दाखला साक्षांकित प्रत
पोलीस आणि सैन्य प्रशिक्षण व शिष्यवृत्तीसाठी पात्रता, अटी/शर्ती व आवश्यक कागदपत्रे
प्रत्येक प्रशिक्षण केंद्रामध्ये 100 अनुसूचित जातीचे विद्यार्थी निवड केले जातील. 20 विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष यादी ठेवण्यात येईल. यामध्ये 30 टक्के जागा महिलांसाठी राखीव राहतील.
पात्रता
1) महाराष्ट्र राज्याचा अनुसूचित जाती मधील उमेदवार असावा.
2) अर्जदाराचे वय 19 ते 32 पर्यंत असावे.
3) अर्जदार किमान दहावी बारावी उत्तीर्ण असावा.
4) महिला उमेदवारांची उंची 155 सेमी असणे आवश्यक.
5) पुरुष उमेदवारांची उंची 165 सेमी असणे आवश्यक तसेच छाती किमान 79 सेमी फुगूवून 79+5 सेमी असणे आवश्यक
6) पोलीस व मिल्ट्री भरती च्या शारीरिक क्षमतेच्या चाचणी च्या पात्रतेनुसार उमेदवारांना निकष लागू राहतील.
प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती
1) प्रशिक्षण केंद्रावर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 9/12/2019 आहे.
2) प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्यांचा राहील
3) विहित नमुन्यामध्ये कागदपत्रांसह अर्ज दाखल केलेल्या पात्र उमेदवारांची चाळणी परीक्षा सदर केंद्रामार्फत दिनांक 12/12/220 रोजी दुपारी 3 वाजता घेण्यात येईल.
4) प्रशिक्षण कोचिंग क्लास दिनांक 15 डिसेंबर 2021 व त्या दरम्यान सुरू होईल
5) निवड झालेल्यांपैकी पात्र विद्यार्थी प्रशिक्षणाकरिता लेखी व शारीरिक चाचणी व पूर्व तयारीकरिता रोज 4 तास व त्यापेक्षा जास्त कालावधीकरिता उपस्थित राहिल. तसेच विद्यार्थी दरमहा एकूण 75 टक्के पेक्षा जास्त कालावधी प्रशिक्षणास उपस्थित राहिल त्या विद्यार्थ्यांना दरमहा 6 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येईल.
6) विद्यार्थ्यांना 5 हजार रुपये किमतीचे निशुल्क साहित्य व पुस्तकांचा संच बार्टी द्वारे प्रशिक्षण केंद्रामार्फत देण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बूट व इतर आवश्यक साहित्य खरेदीकरिता 3 हजार रुपये इतका निधी बार्टी मार्फत देण्यात येईल
7) सदर प्रशिक्षण कार्यक्रम 30 प्रशिक्षण केंद्रामार्फत राबविण्यात येणार आहे. तरी त्या त्या जिल्ह्यांमध्ये कोचिंग घेण्यासाठी इच्छुक उमेदवार संबंधित जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्रावर जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील.
8) विहित नमुन्यातील अर्ज बार्टी पुणे या संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवरुन प्राप्त करून भरता येईल.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
1) उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
2) जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत
3) दहावी व बारावी उत्तीर्ण केलेल्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत
4) शाळा सोडलेल्या दाखल्याची साक्षांकित प्रत
5) उमेदवाराचे आधार कार्ड साक्षांकित प्रत
संपर्क
अधिकृत संकेत स्थळ- https://barti.in/
फोन नं- 020-26333330,26333339,26343600
इमेल- dg@barti.in