Take a fresh look at your lifestyle.

‘या’ हेल्पलाईनच्या मदतीने मातृत्व वंदना योजनेतून महिलांना मिळणार 6 हजार रुपये…

0

केंद्र सरकारने मातृत्व वंदना योजना आणलेली आहे. या योजनेत गर्भवती महिलांना केंद्र सरकार आर्थिक मदत करते. देशभरात कुपोषित मुले जन्माला येऊ नये या योजनेसाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यात महिलांना 6000 रुपये मिळतात. या योजनेत पहिल्या टप्प्यात 1000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 2000 रुपये व शेवटचे 1000 रुपये बाळाच्या जन्मानंतर महिलांना मिळतात. 1 जानेवारी 2017 पासून ही योजना सुरु आहे.

या योजनेची रक्कम केंद्र सरकार, थेटे महिलेच्या खात्यात जमा करण्यात येते. या योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही हेल्पलाईन क्रमांक 7998799804 वर संपर्क करता येतो.

मातृत्व वंदना योजनामध्ये गर्भवती महिलांना केंद्र सरकार आर्थिक मदत करते. महिला आणि तिच्या अपत्याला या योजनेत आर्थिक मदत मिळते. या योजनेत सहभागी होण्यासाठी https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.