साडेचार लाख विद्यार्थ्यांची ABC पोर्टलवर नोंदणी…
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना एका कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेताना ‘क्रेडिट ट्रान्स्फर’ करणे सोईचे व्हावे यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स (एबीसी पोर्टल) सुरू करण्यात आले आहे. या बँकेत विद्यार्थ्यांची माहिती नोंदविण्यात देशात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दुसऱ्या तर मुंबई विद्यापीठ तिसऱ्या स्थानावर आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना बहुशाखीय शिक्षण घेण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास, त्याच्या अभ्यासक्रमाचे ‘क्रेडिट पॉइंट्स’ एका शैक्षणिक संस्थेतून दुसऱ्या संस्थेत ट्रान्स्फर होणे नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अमंलबजावणी होण्यासाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘एबीसी पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. यासाठी कॉलेजमधील विद्यार्थी, तसेच प्राचार्यांना मार्गदर्शन केले.
तसेच परीक्षेचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना एबीसी पोर्टल’ चा आयडी तयार करण्याचे आवाहन केले होते.
पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शिक्षण संस्थांमधील साडेचार लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. – डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गरजेचे असते.
त्यासाठी केंद्र सरकारकडून अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्सचे पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
या पोर्टलवर देशातील विद्यापीठे, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांनी नोंदणी करून, विद्यार्थ्यांची माहिती भरण्याचे आवाहन करण्यात आले होते.
त्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ५ लाख ४ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी तर पुणे विद्यापीठाच्या ४ लाख ४५ हजार ४५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या २ लाख १४ हजार ५६० तसेच वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ १ लाख ५७ हजार ५४६ आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ १ लाख १९ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

एबीसी पोर्टलवर सर्वाधिक नोंदणी केलेल्या देशातील पहिल्या पाच शैक्षणिक संस्थांमध्ये राज्यातील ४ विद्यापीठांनी बाजी मारली आहे. त्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे.