महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३
परीक्षेचा तपशील:- राज्यसेवा मुख्य परीक्षा ७,८ आणि ९ ऑक्टोबर २०२३ रोजी होईल. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ, ब मुख्य परीक्षा १४ ऑक्टोबर २०२३ रोजी होईल. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट-ब मुख्य परीक्षा १४ ऑक्टोबर रोजी होईल. तसेच निरीक्षक वैधमापन शास्त्र गट-ब मुख्य परीक्षा २१ ऑक्टोबर रोजी होईल तर अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब मुख्य परीक्षा २८ ऑक्टोबर रोजी होईल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यासंबंधीची सविस्तर जाहीरात संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत.
पदाचे नाव- नागरी सेवा सामायिक प्राथमिक परीक्षा २०२३
पदसंख्या- ६७३
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 03 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट- https://mpsc.gov.in/
