Take a fresh look at your lifestyle.

राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये आदिवासी वसतिगृह उभारण्यात येणार

0

राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये भूखंड उपलब्ध झाल्यास तेथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

तसेच, आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेच्या विविध संधींमध्ये सहभागी होता यावे व प्रशासनात त्यांना करिअर करण्यासाठी राज्यात स्वतंत्र करिअर अकादमी निर्माण करण्यात येणार असून आठवीच्या वर्गापासूनच राज्यातील 500 विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात येणार आहे.

याशिवाय आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र क्रीडा अकादमीदेखील निर्माण करण्यात येणार असल्याची माहीती मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.