शासन देणार मशरूम युनिट उभारण्यासाठी ८ लाख अनुदान; जाणून घ्या ट्रेनिंग घेण्याची पद्धत
शेतकरी पारंपरिक शेती सोडून बागायती शेती करण्याकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसतो आहे. आता शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांसोबत भाजीपाला, फळे, औषधे, मसाले यांची आंतरशेती करायला सुरवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळून त्यांचा फायदा होत आहे. गेल्या काही वर्षांत मशरूम हे फळबागांचे प्रमुख पीक म्हणूनही उदयास आले आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील शेतकरी मशरूमची लागवड करून चांगला नफा कमावत आहेत.
आज सरकारही मशरूमच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहे. देश-विदेशात सुपरफूड म्हणून मशरूमची मागणी वाढत आहे. आज आपण सरकार मशरूम युनिट उभारण्यासाठी ८ लाख अनुदान कसे देते? त्याकरता प्रक्रिया काय आहे याबाबत जाणून घेणार आहोत.
विशेष म्हणजे मशरूमच्या शेतीसाठी तुम्हाला मोठ्या जागेची किंवा शेतजमिनीची गरज भासणार नाही. अगदी घराच्या चार भिंतींच्या आतदेखील तुम्ही ही मशरूम शेती करू शकता. यासाठी अतिशय सोपं प्रशिक्षणही उपलब्ध आहे. केवळ पौष्टिकता आणि औषधी दृष्टिकोनातूनच नाही, तर निर्यातीसाठीही मशरूम महत्त्वाचं आहे. फक्त 50 हजार रुपये गुंतवणूक करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. मशरूम शेती कशी करावी याची, माहिती येथे देत आहोत.

मशरूम शेतीसाठी ट्रेनिंग कुठे मिळेल?
तुम्ही मोठ्या प्रमाणावर मशरूम लागवड करण्याचा विचार करत असाल, तर एकदा योग्य प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. सरकार अनेक योजनांद्वारे मशरूम उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. अनेकांसाठी मशरूम शेती ही पूर्णपणे नवीन गोष्ट आहे. त्यामुळं त्यांना प्रशिक्षणाची गरज भासते.
देशातली सर्व कृषी विद्यापीठं आणि कृषी संशोधन केंद्रांमध्ये मशरूम लागवडीचं प्रशिक्षण दिलं जातं. एवढेच नाही तर ICAR-Directorate of Mushroom Research द्वारे मशरूम लागवडीचे ऑनलाइन प्रशिक्षण देखील दिले जात आहे, ज्याची संपूर्ण माहिती तुम्ही dmrsolan.icar.gov.in या लिंकवर जाऊन पाहू शकता.