जवाहरलाल नेहरु विद्यापीठ भरती २०२३
जेएनयूमधील विविध पदांसाठी भरती होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या भरतीला सुरुवात झाली असून त्यातील जागांसाठी अर्ज करायची शेवटची तारीख १० मार्च २०२३ आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठामधील ३८८ जागांसाठी ही भरती होणार आहे. तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असल्यास jnu.ac.in ही वेबसाईट सर्च करा. तेथे तुम्हाला रिक्त जागांसंबंधित सर्व माहिती मिळू शकेल. याच साईटवरुन तुम्ही विशिष्ट जागेसाठी अर्ज देखील करु शकता.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये डिप्यूटी रजिस्ट्रारच्या २ जागा, सहाय्यक रजिस्ट्रारच्या ३ जागा, सेक्शन ऑफिसरच्या ८ जागा, सीनिअर असिस्टंटच्या ८ जागा, सहाय्यक असिस्टंटच्या ३ जागा, खासगी असिस्टंटच्या ६ जागा उपलब्ध आहेत. त्यासह स्टेनोग्राफरसाठीची २२ पदे, रिसर्च ऑफिसर्सची २ पदे, संपादक प्रकाशकाची २ पदे रिक्त आहेत. सेमी प्रोफेशनल असिस्टंटच्या ८ जागा, आचाऱ्यांसाठीच्या १९ जागा, मेस हेल्परच्या ४९ जागा, ज्यू. असिस्टंटच्या १०६ जागा, मल्टी टास्किंग स्टाफच्या ७९ जागा, वर्क्स असिस्टंटच्या १६ जागा, इंजिनिअरींग असिस्टंच्या २२ जागा, लिफ्ट ऑपरेटरच्या ३ जागा, सिस्टम अॅनालिस्टच्या २ जागा, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकांसाठीच्या २ जागा, ज्यू, ऑपरेटरच्या २ जागा, स्टॅटिस्टिकल असिस्टंटच्या २ जागा, प्रयोगशाळेतील सहाय्यकाच्या ३ जागा आणि लॅब असिस्टंटच्या २ जागा यांसाठी जेएनयूमध्ये मेगाभरती सुरु आहे.

- University Name: Jawaharlal Nehru University
- Name of the Posts: Non-Teaching Posts
- Number of Posts: 28 Vacancies
- Official Website: www.jnu.ac.in
- Job Location: New Delhi
- Mode of Application: Online
- Last date to Apply: 10th March 2023