Take a fresh look at your lifestyle.

नागरिकांनो आपले येणारे सण होणार गोड; पुरवठा विभागाचा ‘हा’ मोठा निर्णय….

0

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरीशि धापत्रिकाधारकांना सन २०२२ च्या दिवाळी सणानिमित्त प्रत्येकी १ किलो या परिमाणात रवा,च नाडाळ, साखर व १ लिटर या परिमाणात पामतेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला १ संच (आनंदाचा शिधा) ₹१००/- प्रतिसंच या दराने वितरीत करण्यात आला होता.

त्याच धर्तीवर उपरोक्त शिधापत्रिकाधारकांना आगामी गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, इत्यादी सणांनिमित्त प्रत्येकी १ किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर या परिमाणात पामतेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला “आनंदाचा शिधा” गुढीपाडवा या मराठी नविन वर्षापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीकरिता ई-पॉस प्रणालीद्वारे ₹१००/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यास मा. मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आगामी गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, इत्यादी सणांनिमित्त प्रत्येकी १ किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर या परिमाणात पामतेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला “आनंदाचा शिधा” गुढीपाडवा या मराठी नविन वर्षापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीकरिता ई-पॉस प्रणालीद्वारे ₹१००/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

उपरोक्त “आनंदाचा शिधा” करिता आवश्यक शिधाजिन्नसांची खरेदी करण्याकरीता mahatenders.gov.in या ऑनलाईन पोर्टलद्वारे निविदा सादर करण्याचा कालावधी निविदा नोटीसप्र सिद्ध झाल्यापासून २१ दिवसांऐवजी १५ दिवसांचा करुन निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.