Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा परिषद १३ हजार ५२१ पदाची मेगाभरती IBPS कंपनीमार्फत होणार

0

गेल्या काही वर्षापासून जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया रखडली आहे. आता कुठे प्रशासनाकडून भरतीसाठी हालचाली सुरू झाल्या असून, प्रशासनाने प्रत्येक विभागाकडून रिक्त जागांची माहिती मागविली आहे. त्यानुसार संवर्गनिहाय आकडेवारी तयार करण्याचे काम सुरू असून, सरळसेवा भरतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून (IBPS) आयबीपीएस ही कंपनी निश्चित करण्यात आल्याची माहिती जि.प.कडून देण्यात आली आहे.

जि. प.च्या प्रस्तावित भरती प्रक्रियेसाठी आकृतीबंध मंजूर करण्यात आला असून, बिंदूनामावलीदेखील निश्चित केली आहे.

जि. प. च्या भरतीतील ७० टक्के जागा या भरती प्रक्रियेतून भरल्या जातील, तर १० टक्के जागा ग्रा. पं. कर्मचाऱ्यांसाठी २० टक्के जागा या अनुकंपाधारकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

या भरती प्रक्रियेमध्ये आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तज्ज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेविका, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ सहायक, लघु टंकलेखक, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ लेखा अधिकारी, वरिष्ठ सहायक लेखा तसेच ग्रामसेवकांच्या पदांची संख्या यामध्ये सर्वात जास्त आहे.