Take a fresh look at your lifestyle.

महापालिकेतील अग्निशमन, वैद्यकीयच्या रिक्त पदांसाठी TCS चा पर्याय

0

आयबीपीएस या संस्थेशी करार करण्याची वेळ आली असतानाच महापालिकेतील अग्निशमन विभागातील ३४८, तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ पदांवर भरतीसाठी टिसीएस या संस्थेलादेखील पत्र दिले जाणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया लांबणार आहे.

आयबीपीएस संस्थेने महापालिकेच्या भरती प्रक्रियेसंदर्भात टाकलेल्या अटी व शर्तींवर निर्णय न दिल्याने टिसीएस संस्थेकडे देखील पत्र व्यवहार केला जाणार आहे.

पालिका प्रशासनाने दोन्ही संस्थांशी पत्रव्यवहार करून प्रस्ताव मागविले. आयबीपीएस या संस्थेने प्रस्ताव सादर केल्यानंतर भरती प्रक्रिया राबविण्याची प्रशासकीय तयारी करण्यात आली.

परंतू पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुक आचारसंहितेमुळे प्रक्रिया रखडली.२ फेब्रुवारीला आचारसंहिता संपुष्टात आल्याने पुन्हा भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतू आयबीपीएसकडून करारातील अटी व शर्तीसंदर्भात प्रतिसाद मिळत नसल्याने टिसीएसकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. अशी माहिती प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी दिली.

रिक्त पदांच्या भरतीसाठी टिसीएसकडून देखील प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. दोन्ही प्रस्तावांची छाननी करून अंतिम निर्णय घेतला जाईल.
-मनोज घोडे-पाटील, उपायुक्त, प्रशासन विभाग